Austin Marathi Mandal - website
  • Home
  • AMM Bylaws
  • Shala
  • Sponsorship
  • Membership
    • Subscribe to AMM
  • Snehadeep
  • Committee
    • 2025 Committee
    • Events of 2025
    • 2024 Committee
    • Events of 2024
    • 2023 Committee
    • Events of 2023
    • Events of 2022 >
      • 2022 Committee >
        • Events >
          • Events of 2021
          • Events of 2018
          • Events of 2016
          • Events of 2019
          • Events of 2020
          • Events of 2015
          • Events of 2017
    • Past Committees (2016 - 2020) >
      • Feedback
      • Contact >
        • Volunteering Opportunities
        • Privacy
        • International Student Corner
      • 2021 Committee
    • Past Committees (2007 - 2015)

Events of 2024 - From President Sripriya's Desk

- मकर संक्रांत उत्सव, ह्यात आपण आपल्या स्थानिक लघु उद्योजकांना आंनद मेळ्यात त्यांचे स्टॉल्स लावण्यासाठी प्रोत्साहित केले होते. तसेच भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला ज्यासाठी AMM च्या संस्थापकांपैकी श्री दिलीपकाका कर्णिक तसेच सेडर पार्क चे महापौर श्री Jim Penniman-Morin उपस्थित होते. ह्या कार्यक्रमात मंडळाच्या सदस्यांना २०२४ चे कालनिर्णय वाटपही करण्यात आले. As a goodwill gesture, मी सर्व उपस्थित भगिनींसाठी संक्रांती वाणाचे प्रयोजन केले. 

- स्वात्यंत्रवीर सावरकर पुण्यतिथी तसेच मराठी भाषा गौरव दिन सोहळा, ह्या कार्यक्रमात डॅलस चे श्री कांचन कुलकर्णी ह्यांनी स्वात्यंत्रवीर सावरकरांवर एक उत्तम असे व्याख्यान सादर केले. तसेच आपल्या ऑस्टिनच्या गायक, कलाकार व सदस्यांनी स्वात्यंत्रवीर सावरकर, कुसुमाग्रज रचित गाणी व कविता ह्यांचे गायन व वाचन केले. हा कार्यक्रम मंडळाच्या सदस्यांसाठी विनामूल्य (with RSVP) होता.  

- क्रिकेट स्पर्धा, ह्यात आपण मुलींची टेक्सास रिजनल्स तसेच मुलांची ऑस्टिन मंडळ अंतर्गत क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. टेक्सास रिजनल्स स्पर्धेमध्ये ह्यूस्टनच्या मुलींचा वॉरियर्स हा संघ ऑस्टिनच्या मुलीच्या शिवनेरी संघाविरुद्ध मैदानात होता. शिवनेरी संघाने सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा जिंकली. टेक्सास रिजनल्स चे पारितोषिक बृहन महाराष्ट्र मंडळाने प्रायोजित केले होते. मंडळ अंतर्गत मुलाच्या स्पर्धे मध्ये ३ संघानी भाग घेतला होता. मावळे, मॅवरिक्स, वॉरियर्स. ऑस्टिनचे मावळे ह्या संघाने मुलांची स्पर्धा जिंकली. ह्या स्पर्धेसाठी श्री अमर गुल्हाने (Ramendu Realty) , श्री संजीत ताम्हाणे (Pure Realty) तसेच पेरी होम्स ह्यांनी स्पॉन्सरशिप दिली. ज्याचा उपयोग सर्व टीम्स ना मॅच जर्सी देण्यात केला गेला. 

- शिवरायांचा छावा, श्री छत्रपती संभाजी राजे ह्यांच्या जीवनावरील मराठी चित्रपट शिवरायांचा छावा ह्याचे मंडळाने BMM च्या सोबतीने आयोजन केले होते. ऑस्टिन मराठी शाळेच्या विद्यार्थी, पालक तसेच त्यांच्या भांवडांना श्री छत्रपती संभाजी राजे ह्यांच्या जीवनाची ओळख व्हावी म्हणून अल्प दरात हा चित्रपट दाखवण्यात आला. 

- नाट्यपर्ण २, गतवर्षी प्रमाणे ह्यावर्षीही मंडळाने आपल्या स्थानिक कलाकारांच्या (अवांतर ऑस्टिन) सहकार्याने त्यांच्या २ एकांकिकांचे आयोजन केले होते. ह्यात ११-१२ स्थानिक तसेच २ पाहुण्या कलाकार / दिग्दर्शकांनी काम केले. उस्फुर्त प्रतिसादामुळे पहिला शो हाऊसफुल झाल्याने नाट्यपर्ण २ चे २ शो करण्यात आले.

अंतरराष्ट्रीय महिला दिन, महिला दिनाच्या निमित्ताने मंडळाने महिलांसाठी एक Wellness Session आयोजित केला होता. ह्या परिसंवादात डॉ. अमृता वैंगणकर , डॉ. मेघना दांडेकर , डॉ. लक्ष्मी अटकुरी, डॉ. कनकदुर्गा गोविंदराजु, डॉ. यशश्री मोहिले, डॉ. अश्विनी जोशी ह्यांनी भाग घेऊन मार्गदर्शन केले. उपस्थितांपैकी मराठी शाळा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच Women's Awards for excellence ह्या पुरस्काराने सौ. अस्मिता फडके काशीकर, सौ. धनश्री कोंड्रा जक्कल, डॉ. पूनम राणे,  सौ. पुनीता भडसावळे परांजपे, सौ. अश्विनी खरे ह्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच फक्त महिलांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले होते.

 - रामनवमी, अयोध्येमध्ये ह्यावर्षी राम मंदिराचे उदघाटन झाल्याच्या निमित्ताने शाळेने रामनवमी मोठ्या प्रमाणावर उस्फुर्तरित्या साजरी केली. मंडळाच्या सदस्यांपैकी श्री सलील माळशे, श्री प्रवीण जाधव तसेच श्री प्रतीक भोसेकर तसेच कार्यकर्ते श्री मिलींद दिवाकर ह्यांनी सुंदर अशी पालखी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बनवली. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी रामायणावरील पथनाट्य, गायन, श्लोक पठण सादर केले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन मंडळातर्फे अत्यल्प दरात करण्यात आले.  

- जानेवारी ते एप्रिल २०२४ ह्या काळात सौ. पुनीता भडसावळे परांजपे तसेच श्री प्रतीक भोसेकर ह्यांनी मारुती स्तोत्राचे तास शाळा विद्यार्थ्यांसाठी घेतले. मारुती स्तोत्राचे पठाण विद्यार्थी मित्रांनी रामनवमी उत्सवात केले. 

- महाराष्ट्र दिन (5 K Walk), महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने Health is wealth ह्या म्हणीनुसार 5 K Walk चे आयोजन ब्रशी क्रिक लेक पार्क मधे करण्यात आले होते. 

- नाट्यमहोत्सव, ह्यात ऑस्टिन, डॅलस तसेच ह्युस्टन मधून ६ गटांनी एकांकिका साजऱ्या केल्या. ६ गटांमधे मिळून ७५ कलाकारांनी भाग घेतला. ऑस्टिनचे २०, डॅलस चे ४५ तसेच ह्युस्टन च्या १० कलाकारांना मंडळातर्फे व्यासपीठ देण्यात आले. ह्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर ऑस्टिनच्या कलारसिकांनी दाद दिली. ह्या कार्यक्रमानिमित्ताने ऑस्टिन, डॅलस तसेच ह्युस्टन मंडळांमधे सहकार्य वृद्धी होण्यास खूप मोठी मदत झाली आहे. २०२५ साली डॅलस येथे होणाऱ्या BMM मैत्री मेळाव्यासाठी हे सहकार्य खूपच महत्वाचे ठरेल ह्यात शंका नाही. 
आषाढी वारी, जुलै व ऑगस्ट महिन्यात आषाढ महिन्याच्या निमित्ताने मंडळाने वारी चे आयोजन केले होते. ह्यामधे ऑस्टिन मधील वारकर्यांनी त्यांच्या कुवतीनुसार देहू/आळंदी  ते पंढरपूर ह्या अंतराच्या १००%. ७५%, ५०% अथवा २५% अंतर पार केले. वारी सोबतच व्यायाम (health) हा ह्या उपक्रमाचा भाग होता.

- संकर्षण व्हाया स्पृहा, मराठीतील तरुण रक्ताचे लोकप्रीय कलाकार श्री संकर्षण कऱ्हाडे व सौ. स्पृहा जोशी लघाटे ह्यांच्या कार्यक्रमाचे ACube Media च्या सहाय्याने आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आधी आषाढी वारीची सांगता श्री. संकर्षण ह्यांच्या हस्ते पांडुरंगाची पूजा करून झाली. पूजेआधी मंडळाने पांडुरंगाची पालखी चे रिंगण करून हरिनामाचा गाजर केला. एका रात्रीत १०० तिकिटे विकत घेऊन रसिकांनी नवा इतिहास घडवला. संकर्षण, स्पृहा, विनय तसेच गंधार ह्यांचे  पुढे ३ दिवस ऑस्टिनने आदरातिथ्य केले.

- President's Volunteer Service Award, यावर्षी ऑस्टिन मराठी मंडळ US President's Volunteer Service Award पात्र झाले आहे. २०२३-२४ वर्षाचे पात्र स्वयंसेवकांना ( US Citizen & GC Holders) प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

- पूर्ण वर्षभरात मंडळाने BMM तसेचं Prime Media च्या साहाय्याने विविध मराठी चित्रपटांचेही आयोजन केले होते. जसे श्रीदेवी प्रसन्न, अलीबाबा आणि चाळिशीतले चोर, स्वरगंधर्व सुधीर फडके, नाच ग घुमा, अमलताश. 

- अंतरराष्ट्रीय योग दिवस, योग दिवसाच्या निमित्ताने सेडर पार्क येथे मंडळाच्या वतीने योगासनांचे आयोजन करण्यात आले होते.  सौ. मृदुला कुलकर्णी ह्यांनी योग मार्गदर्शन केले. उपस्थितांना मंडळाच्या वातीने अल्पोपहार देण्यात आला.

- आपण प्रथमच भारतीय स्वतंत्र्य दिन ह्या वेळेस टेक्सास स्टेट कॅपिटॉल च्या साऊथ स्टेप्स वर केला. ह्यात ऑस्टिन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच मंडळाच्या सदस्यांनी भाग घेतला. देशभक्तीपर गाणी, वाद्य, ढोल ताशा (महाराष्ट्र माझा) तसेच पथनाट्याचे या वेळी आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य होता. ज्ञान प्रबोधिनी फौंडेशन च्या खजिनदार विद्याताई हर्डीकर सप्रे ह्यांच्या हस्ते भारतीय ध्वजारोहण झाले. उपस्थितांना मंडळाच्या वातीने अल्पोपहार देण्यात आला. 

मंगळागौर, बऱ्याच वर्षांच्या अंतरानंतर मंडळाने ह्यावर्षी पुन्हा एकदा मंगळागौरीचे आयोजन केले होते. पारंपरिक खेळ, गाणी ह्यासोबतच उत्तम असे पुरणपोळी चे जेवण उपस्थित मैत्रिणींना देण्यात आहे.

- महागणपती उत्सव
.  हरतालिका, गणेशोत्सवाच्या आधी मंडळाने मैत्रिणीसाठी विनामूल्य अश्या हरतालिका पूजेचे आयोजन केले होते. ह्यावेळेस पारंपरिक पूजेसोबतच, कथावाचन झाले. उपस्थितांना मंडळाच्या वातीने फराळ देण्यात आला.  अथर्वशीर्ष पठण - गणेशोत्सवातील ८ दिवस मंडळाच्या वतीने ऑनलाईन अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात २०-३० जणांनी त्याचा लाभ घेतला.
. सार्वजनिक गणपती स्थापना - आपल्या मंडळाच्या गणपतीची स्थापना माझ्या घरी केली. ऑस्टिन मधील बरेच कुटुंबांनी मंडळाच्या गणपतीचे माझ्या घरी येऊन दर्शन तसेच दुपारच्या वा संध्याकाळच्या आरतीचा लाभ घेतला. . संजीत ताम्हाणे, नेहा व मंगेश पाथरे, धनश्री कोंड्रा जक्कल, तुलसी रेस्टॉरंट तसेच बाकीच्या सर्व प्रयोजक व देणगीदारांनी मदतीचा हात मंडळाकडे पुढे केला.
. मंडळाने ह्यावर्षी सर्व बाळ तसेच प्रौढ कलाकारांना उत्तम व्यसपीठ मिळावे म्हणून Performing Arts Center चे आयोजन केले. ह्याचा लाभ ४० पेक्षा अधिक कलाकार चमूंनी घेतला. नेहमीप्रमाणे ऑस्टिनच्या आपल्या महाराष्ट्र माझा चमूने उत्तम असे ढोल ताशा लेझीम चे प्रदर्शन केले.
. मराठी मातीतील लोककलांचा प्रसार व्हावा ह्या उद्देशाने मंडळाने ह्या वर्षी गणेशेत्सवात महाराष्ट्रातील सर्वोत्तम असे संबळ वादक शाहीर श्री. हरिदास शिंदे, पांडुरंग शिंदे तसेच सहगायक श्री राम पांढरे ह्यांना आमंत्रित केले होते. त्यांच्या हरिरंग ह्या लोककला कार्यक्रमात संबळ वादन, देवीचा गोंधळ, पोवाडा, कीर्तन भारूड इ विविध कला त्यांनी सादर केल्या. सर्व उपस्थितांना हा कार्यक्रम आवडला.
. तुलसी रेस्टॉरंट च्या सोबतीने मंडळाने ह्यावर्षी चटकदार अस्या मराठमोळ्या जेवणाचे आयोजन केले होते ज्यात पाटवडी रस्सा, आम्रखंड, कोथिंबीर वडी, पुरी, पोळी, मसाले भात, साधे वरण  भात, बटाटा भाजी, कोशिंबीर असे चवदार पदार्थ होते. कोथिंबीर वडी तसेच पुऱ्या onsite food truck मधे तळून उपस्थितांना गरम गरम  वाढण्यात आल्या. 


महाराष्ट्राची हास्यजत्रा, Five Dimensions ह्या संस्थेच्या सोबतीने मंडळाने लोकप्रिय मराठी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा चे आयोजन केले होते. कार्यक्रमास ४०० होऊन अधिक रसिकांनी खूप छान प्रतिसाद दिला. मंडळाच्या सदस्यांना ह्या कार्यक्रमासाठी १०% सवलत देण्यात आली. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंडळाने २०००-२२००$ ची सवलत सदस्यांना दिली.
 

- भोंडला, गरबा व दांडिया, नवरात्राच्या निमित्ताने मंडळाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ह्यात पारंपरिक भोंडला, कन्यापूजन, तसेच गरबा व दांडिया चा समावेश होता. कार्यक्रमात उपस्थितांना जेवण देण्यात आले. हे सर्व जेवण मंडळ कमिटी सदस्यांनी स्वतः घरी बनवलेले होते वा स्पॉन्सर केले होते. खूप कमी तिकीटदरात हा कार्यक्रम करण्यात आला.

- दिवाळीसंध्या, बऱ्याच वर्षांच्या अंतराने मंडळाने दिवाळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिवाळीनिमित्त सर्व उपस्थित व मंडळाच्या सदस्यांना दिवाळी फराळ तसेच २०२५ कालनिर्णय चे वाटप करण्यात आले. ह्यावेळी बाबूजी आणि मी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री श्रीधर फडके, सौ. दीपिका जोग दातार व मंडळींसोबतच आपल्या ऑस्टिनच्या कलाकारांनीही ह्यात भाग घेतला (वाद्य, कोरस, निवेदन ई). सौ. मोसमी चव्हाण नौकुडकर संपादित करत असलेल्या स्नेहदीप २०२४ ह्या मंडळाच्या वार्षिक अंकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण ही श्री श्रीधर फाडके ह्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी दीपमहोत्सव साजरा करण्यात आला. उत्तम अश्या जेवणाचेही नियोजन करण्यात आले होते.
 

- Restating Austin Marathi Mandal Constitution:आपल्या मंडळाच्या जुन्या व जाणत्या स्वयंसेवकांनी आपले पोटकायदे (bylaws) बनवण्यात खूप महत्वाचे योगदान दिने आहे. Austin Marathi Mandal is forever grateful to you. मंडळाचे धोरण व प्रक्रिया अजून कार्यक्षमरित्या चालाव्या ह्या उद्देशाने मंडळाने ह्यावर्षी पोटकायदा अभ्यास उपसमिती स्थापन (सौ. श्रीप्रिया राव भोसेकर, श्री प्रसाद पानवलकर, सौ शिल्पा शेणोलीकर शर्मा, सौ किम देवधर गोखले व श्री संदीप बेलखोडे) केली आहे. उपसमितीने दिलेल्या सल्ल्यांवर, तसेच मंडळ सदस्यांनी दिलेल्या सल्ल्यांवर काम करण्यासाठी मंडळाने पोटकायदा दुरुस्ती उपसमिती (सौ. श्रीप्रिया राव भोसेकर, श्री प्रसाद पानवलकर, सौ शिल्पा शेणोलीकर शर्मा व श्री संदीप बेलखोडे) नेमली आहे. पोटकायदा दुरुस्ती उपसमिती व मंडळ कमिटी ह्यावर्षी आपल्या पोटकायद्यांचे पुनरावलोकन कायदेशीर रित्या वकिलांकडून करून घेणार आहे. ह्या सर्व प्रक्रियेत मंडळ सदस्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे. पुनरावलोकन झालेले पोटकायदे मंडळ सदस्यांसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदानासाठी ठेवण्यात येतील. 


आपली मराठी शाळेची विद्यार्थी संख्या आता २३० झाली आहे. आपल्याकडे ४०+ शिक्षक आहेत. उत्तर ऑस्टिन मध्ये Patsy Sommer एलिमेंटरी शाळा कॅफेटेरियात तर दक्षिण ऑस्टिन मधे Circle C Community Center अशा २ ठिकाणी आपली शाळा भरते. ह्यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना शाळेने Tshirts व Drawstring bags दिल्या असेच सर्व शिक्षकांनाही वेगळ्या रंगाचे Tshirts व Tote bags दिल्या. १७ नोव्हेंबर रोजी आपल्या शाळेचे पिकनिक आयोजित करण्यात आले होते.The picnic was organized and lead by our Shala high schoolers. ह्यावर्षी दिवाळी निमित्ताने शाळेने सामाजिक कार्य देखील केले. शाळा तसेच ऑस्टिन मराठी मंडळ हे ज्ञान प्रबोधिनी हराळी शाळेसाठी ग्रंथालय नूतनीकरणासाठी निधीसंकलन करीत आहे. ३ नोव्हेंबर रोजी दिवाळी निमित्त शाळा विद्यार्थी हराळी येथे शाळेतील विद्यार्थ्यांसोबत online संवाद साधून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच दिवाळीची शुभेच्छा पत्रे ही भारतात पाठवले.

As a giving back to the community Austin Marathi Mandal organized a fundraiser and was able to get donations of more than $3000 which will be donated to Jnana Prabhodini Foundation and part of it will be utilized to serve a good cause for our community here in Austin.
​

माझ्या कमिटीमधील सर्व पदाधिकारी (श्री. प्रवीण जाधव, सौ. अदिती आचार्य सप्रे, सौ. लीना पाटील बागुल, सौ. पुनीता भडसावळे परांजपे, श्री. प्रसाद पानवलकर) व सहकाऱ्यांच्या (सौ. पल्लवी देशमुख, सौ. नेहा पाथरे, श्री. अनुप मुळ्ये, श्री. शशांक शिंदे, सौ. शिल्पा शेणोलीकर शर्मा ,सौ. भाग्यश्री कुलकर्णी जोग,सौ. केतकी कडियाल ,सौ. मुक्ता कुलकर्णी देशपांडे ) सहकार्याचा AMM च्या कार्यात खूप महत्वाचे योगदान आहे.मी व माझे सर्व सहकारी त्यांच्या परिवाराच्या आधाराशिवाय हे volunteering करू शकत नाही.   त्यांच्या सहभागाशिवाय हे शिवधनुष्य पेलणे सोपे नव्हते. मी सर्व सहकारी, त्यांचा परिवार तसेच सर्व स्वयंसेवकांची आभारी आहे. 

 

  • Home
  • AMM Bylaws
  • Shala
  • Sponsorship
  • Membership
    • Subscribe to AMM
  • Snehadeep
  • Committee
    • 2025 Committee
    • Events of 2025
    • 2024 Committee
    • Events of 2024
    • 2023 Committee
    • Events of 2023
    • Events of 2022 >
      • 2022 Committee >
        • Events >
          • Events of 2021
          • Events of 2018
          • Events of 2016
          • Events of 2019
          • Events of 2020
          • Events of 2015
          • Events of 2017
    • Past Committees (2016 - 2020) >
      • Feedback
      • Contact >
        • Volunteering Opportunities
        • Privacy
        • International Student Corner
      • 2021 Committee
    • Past Committees (2007 - 2015)