Austin Marathi Mandal - website
  • Home
  • Shala
  • Sponsorship
  • Membership
    • Subscribe to AMM
  • EVENTS
    • ANAND MELA 2026
    • Womens Day 2026
    • Geet Ramayan 2026
    • Snehadeep
    • Volunteering Opportunities
    • Events of 2025
  • Committee
    • 2025 Committee
    • 2024 Committee
    • Past Committees (2016 - 2020) >
      • 2021 Committee
    • Past Committees (2007 - 2015)
  • AMM Bylaws
  • BMM
    • BMM Website
    • BMM 2026 Registration

Events of 2025 - From President Sripriya's Desk

January -मकर संक्रांत उत्सव, ह्यात आपण आपल्या स्थानिक लघु उद्योजकांना आंनद मेळ्यात त्यांचे स्टॉल्स लावण्यासाठी प्रोत्साहित केले होते. तसेच भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला.  As a goodwill gesture, मी सर्व उपस्थित भगिनींसाठी संक्रांती वाणाचे प्रयोजन केले. ह्यावेळी सा रे गा मा ह्या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यात २० पेक्षा जास्त सर्व वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला. Kite festival चे ही आयोजन करण्यात आले होते ज्यात ४०+ जणांनी भाग घेतला.

February -फेब्रुवारी मधे AMM कराओके चे आयोजन करण्यात आले होते ज्यात १५+ गायकांनी सहभाग घेतला. 

ऑस्टिन मराठी मंडळाने कल्लोळ च्या सहयोगाने  १४ फेब्रुवारी ला मराठी रंगभूमी वरील ख्यातनाम कलाकार श्री. दिलीप प्रभावळकर तसेच श्री. विजय केंकरे ह्यांच्या "पात्रापत्री" ह्या एका वेगळ्या फॉरमॅट मधील नाटकाचे आयोजन केले होते. जवळजवळ १५० प्रेक्षकांनी ह्या नाटकाचा आस्वाद घेतला. ह्या नाटकाचा सर्व खर्च मंडळाने केला.  
March - अंतरराष्ट्रीय महिला दिन, महिला दिनाच्या निमित्ताने मंडळाने Women In Tech विषयावर Session आयोजित केला होता. ह्या परिसंवादात सौ. स्मिता कुलकर्णी  ह्यांनी भाग घेऊन मार्गदर्शन केले.

२०२५ मधे ऑस्टिन मराठी मंडळाने ऑस्टिन मराठी शाळा च्या विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या सहयोगाने एका उत्तम अश्या शिवमहानाट्याचे आयोजन केले होते. ह्यात १००+ लोकांनी सहभाग नोंदवला. DFMMM चे माजी अध्यक्ष सुजित साठे ह्यांनी ह्या उपक्रमासाठी मूल्यवान मार्गदर्शन केले. DFWMM ने काही props साठी मदत केली. मंडळातर्फे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी करण्यात आली. ह्या कार्यक्रमासाठी उत्तम अश्या नॉर्थपॉईंट ऑडीटोरियम चे आयोजन करण्यात आले होते. ऑस्टिनमधील Diversity Band ने ढोल ताशा लेझीम perform केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांतर्फे काही गाणी सादर करण्यात आली. ह्या कार्यक्रमात महिला दिनाच्या निमित्ताने ऑस्टिन मधील मराठी महिला लघु उद्योजिकांना फ्री मार्केटिंग टेबल ची सुविधा देण्यात आली.
​April- ऑस्टिन मराठी मंडळाने डॅलस मध्ये १९-२० एप्रिल ला झालेल्या DFWMM - BMM मैत्री मेळाव्याचे co-host म्हणून मदत केली. डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळाने BMM च्या साथीने ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ५०+ ऑस्टिन मधील मराठी बांधवानी मेळाव्याच्या विविध कार्यक्रमात भाग घेतला. जर तर ची गोष्ट, देवकी पंडित कॉन्सर्ट तसेच DFWMM च्या शिवमहानाट्याचा रसिकांनी आस्वाद घेतला. ऑस्टिन मराठी शाळेने एका skit तसेच BMM शाळा समूहगीत गायनात भाग घेतला. ह्यात १५+ शाळा विद्यार्थी तसेच शिक्षकांनी भाग घेतला. BMM अध्यक्ष प्रसाद पानवलकर ऑस्टिनचे रहिवासी आहेत, ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने BMM, DFWMM, AMM ह्यांच्यातील समन्वय दिसून आले.

May - महाराष्ट्र दिन (5 K Walk), महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने Health is wealth ह्या म्हणीनुसार 5 K Walk चे आयोजन ब्रशी क्रिक लेक पार्क मधे करण्यात आले होते.

June, July-आषाढी वारी, जून  व जुलै  महिन्यात आषाढ महिन्याच्या निमित्ताने मंडळाने वारी चे आयोजन केले होते. ह्यामधे ऑस्टिन मधील वारकर्यांनी त्यांच्या कुवतीनुसार देहू/आळंदी  ते पंढरपूर ह्या अंतराच्या १००%. ७५%, ५०% अथवा २५% अंतर पार केले. वारी सोबतच व्यायाम (health) हा ह्या उपक्रमाचा भाग होता. वारी ची सुरुवात २१ जून ला ब्रशी क्रीक लेक पार्क मध्ये  ५K walk ने झाली. आषाढी वारीची सांगता ऑस्टिन हिंदू मंदिरात पांडुरंगाची पूजा करून झाली. पूजेनंतर मंडळाने पांडुरंगाची पालखी चे रिंगण करून हरिनामाचा गाजर केला. २००+ भाविकांनी ह्या कार्यक्रमात भाग घेतला. हा कार्यक्रम सर्वांसाठी free होता. प्रसाद वाटपही करण्यात आले.
President's Volunteer Service Award, २०२४ वर्षाचे पात्र स्वयंसेवकांना ( US Citizen & GC Holders) प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
- पूर्ण वर्षभरात मंडळाने BMM तसेचं 5 Dimensions च्या साहाय्याने विविध मराठी चित्रपटांचेही आयोजन केले होते. जसे मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी (अमेरिकेतील पहिला Screening तो ही हाऊसफुल !), फस्क्लास दाभाडे , दशावतार व अभंग तुकाराम. अभंग तुकाराम हा चित्रपट शाळा विद्यार्थी व पालकांना अल्प दारात दाखवण्यात आला.

August:मंगळागौर, ह्या वर्षीही  मंडळाने पुन्हा एकदा मंगळागौरीचे आयोजन केले होते. पारंपरिक खेळ, गाणी ह्यासोबतच उत्तम असे पुरणपोळी चे जेवण उपस्थित मैत्रिणींना देण्यात आहे.

May, October:5 Dimensions ह्या संस्थेच्या सहयोगाने मंडळाने २ नाटकांचे आयोजन केले होते. १६ मे - "वाडा चिरेबंदी" व  ३१ ऑक्टोबर  "मर्डरवाले कुलकर्णी". ह्यातील वाडा चिरेबंदी हे नाटक मंडळाने local support & marketing partner म्हणून केले तर मर्डरवाले कुलकर्णी ह्या नाटकाचा सर्व खर्च मंडळाने केला. जवळजवळ २७५+ प्रेक्षकांनी ह्या नाटकांचा आस्वाद घेतला. ह्या नाटकात मराठीतील लोकप्रिय कलाकार प्रसाद ओक, वैभव मांगले, निवेदिता सराफ, भार्गवी चिरमुले, निमिष कुलकर्णी व इतर तसेच सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी ह्यांचा सहभाग होता.

BMM च्या सहयोगाने मंडळाने ४ ऑक्टोबर ला मराठीतील लोकप्रीय कलाकार प्रशांत दामले व हृषीकेश शेलार ह्यांच्या अवॉर्ड विंनिंग विनोदी नाटक "शिकायला गेलो एक" चे आयोजन केले होते. ह्या नाटकाचा सर्व खर्च मंडळाने केला. ३७५+ प्रेक्षकांनी नाटकाला उपस्थित राहून दाद दिली. एका तासात १००+ तिकिटे विकण्याचा विक्रमही ह्या कार्यक्रमाने केला

September-महागणपती उत्सव
. सार्वजनिक गणपती स्थापना - आपल्या मंडळाच्या गणपतीची स्थापना माझ्या घरी केली. प्रयोजक व देणगीदारांनी मदतीचा हात मंडळाकडे पुढे केला.
. मंडळाने ह्यावर्षीही सर्व बाळ तसेच प्रौढ कलाकारांना उत्तम व्यसपीठ मिळावे म्हणून Performing Arts Center चे आयोजन केले. ह्याचा लाभ २० पेक्षा अधिक कलाकार चमूंनी घेतला ज्यात ४०+ शाळा विद्यार्थी तसेच शिक्षकांचा सहभाग होता. ऑस्टिनच्या Diversity Band  चमूने उत्तम असे ढोल ताशा लेझीम चे प्रदर्शन केले.
. मराठी मातीतील लोककलांचा प्रसार व्हावा ह्या उद्देशाने मंडळाने ह्या वर्षी गणेशेत्सवात महाराष्ट्रातील कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे बुआ ह्यांच्या गणेश पुराणावरील कीर्तनाचे आयोजन केले होते. त्यांच्या सोबतीला पंडित अविराज तायडे ह्यांच्या अभंग गायन कार्यक्रमचेही आयोजन करण्यात आले होते. सर्व उपस्थितांना हा कार्यक्रम आवडला.
. तुलसी रेस्टॉरंट च्या सोबतीने मंडळाने ह्यावर्षी उत्तम, गरम व चटकदार अस्या मराठमोळ्या जेवणाचे आयोजन केले होते.

October- दिवाळी निमित्त,  ऑस्टिन मराठी शाळेत दिवाळी साजरी करण्यात आली. तसेच मंडळाच्या सदस्यांना प्रत्येक कुटुंबामागे १ पाकीट असे फराळ वाटप करण्यात आले. दिवाळी सोबतच ऑस्टिन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी रामनवमी, भोंडला व गुढीपाडवा त्यांचे विविध गुणदर्शन करून साजरा केला.
आपली मराठी शाळेची विद्यार्थी संख्या आता २२० झाली आहे. आपल्याकडे ३७+ शिक्षक आहेत. उत्तर ऑस्टिन मध्ये Patsy Sommer एलिमेंटरी शाळा कॅफेटेरियात तर दक्षिण ऑस्टिन मधे Bear Creek  एलिमेंटरी शाळा कॅफेटेरियात अशा २ ठिकाणी आपली शाळा ह्या वर्षी ही भरत आहे. शाळेच्या ५० + विद्यार्थ्यांनी शिवजयंती महानाट्यात तसेच गणेशोत्सवात २ स्किट्स मध्ये भाग घेऊन विविध गुण दर्शन केले. ह्या सर्वात शाळा शिक्षक तसेच पालकांनी खूप महत्वाची भूमिका बजावली.  

December: Austin Marathi Mandal Organized “Abhang Tukaram” movie screening with discounted prices for Shala students.
During the event AMM Founder Member Mr. And Mrs.Dilip and Shubha donated $1000 towards Austin Marathi Shala.

माझ्या कमिटीमधील सर्व पदाधिकारी (सौ. पल्लवी देशमुख, सौ. अदिती आचार्य सप्रे, श्री. शशांक शिंदे, सौ. नेहा पाथरे , श्री. प्रसाद पानवलकर) व सहकाऱ्यांच्या ( श्री. अनुप मुळ्ये, सौ. शिल्पा शेणोलीकर शर्मा ,सौ. केतकी कडियाल ,सौ. मुक्ता कुलकर्णी देशपांडे, Ms. रती सोनटके, सौ. मधूर शेंडे ) सहकार्याचा AMM च्या कार्यात खूप महत्वाचे योगदान आहे.मी व माझे सर्व सहकारी त्यांच्या परिवाराच्या आधाराशिवाय हे volunteering करू शकत नाही.   त्यांच्या सहभागाशिवाय हे शिवधनुष्य पेलणे सोपे नव्हते. मी सर्व सहकारी, त्यांचा परिवार तसेच सर्व स्वयंसेवकांची आभारी आहे.

 

  • Home
  • Shala
  • Sponsorship
  • Membership
    • Subscribe to AMM
  • EVENTS
    • ANAND MELA 2026
    • Womens Day 2026
    • Geet Ramayan 2026
    • Snehadeep
    • Volunteering Opportunities
    • Events of 2025
  • Committee
    • 2025 Committee
    • 2024 Committee
    • Past Committees (2016 - 2020) >
      • 2021 Committee
    • Past Committees (2007 - 2015)
  • AMM Bylaws
  • BMM
    • BMM Website
    • BMM 2026 Registration