काही अपरिहार्य कारणांमुळे १ मार्च रोजी ठरवलेले "आशा" चित्रपटाचे प्रदर्शन ऑस्टिन मराठी मंडळाला रद्द करावे लागत आहे.
परंतु, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये Breast Cancer Awareness साठी निधी उभारणीचा आमचा उपक्रम अजूनही चालू आहे. खालील लिंकवरून तुम्ही या उपक्रमासाठी आपले योगदान देऊ शकता.
१ मार्च रोजी चित्रपट प्रदर्शनासोबत एक चर्चासत्र देखील ठरवले होते, जे आम्ही लवकरच पुन्हा आयोजित करत आहोत. सुयोग्य ठिकाण उपलब्ध होताच आम्ही त्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करू. या अचानक बदलामुळे तुमच्या झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व !