ऑस्टिन मराठी मंडळ : संक्षिप्त इतिहाससंकलन: भूषण नानिवडेकर
(विशेष सहाय्य: सौ. अलका व डॉ. प्रशांत वळंजू)
प्रथम आवृत्ती - नोव्हेंबर २०११
प्रथम उजळणी (Revision) - नोव्हेंबर २०१३
द्वितीय उजळणी (Revision) - मार्च २०१५
इतिहास संशोधन हा मानवी स्वभावाचा एक स्वाभाविक पैलू आहे. अगदी आपला चिमुरडा चिंटू देखील आपल्या अस्तित्वाबद्दल त्याला पडलेले शेकडो प्रश्न, दुधाचे दात पडायच्या आतच विचारायला सुरुवात करतो. आपल्या उत्पत्तीचे कोडे सोडवण्यात एक वेगळीच गम्मत आहे. असाच काहीसा हा प्रयत्न, आपल्या मंडळाची मुळे शोधण्याचा!
आपले मंडळ आता चिमुरडे राहिलेले नाही. पण आपल्यापैकी बहुतांशी नवीन सदस्यांना त्याच्या जन्माबद्दल विशेष माहिती नाही आणि ती लेखी स्वरूपात फारशी संकलित केलेली नाही. एखादे मराठी अथवा महाराष्ट्रीय कुटुंब ऑस्टिनमध्ये स्थलांतरित व्हायला निघाले की पहिला प्रश्न त्यांच्या मनात येतो की ऑस्टिनमध्ये मराठी मंडळ आहे का? मग इथे येऊन मंडळाचा मोठा व्याप पहिला की मग पुढचा प्रश्न सहज मनात येतो की इथे बरीच मराठी लोकसंख्या दिसत आहे म्हणजे ऑस्टिनचा मराठी इतिहास किती वर्षांचा असावा बरं? तर मंडळी असेच काहीसे प्रश्न धसास लावण्याच्या दृष्टीने, यंदा आम्ही AMM ची पाळेमुळे खोदून काढायचे ठरवले. त्यादृष्टीने एक इ-मेल ऑस्टिनमध्ये बरीच वर्षे स्थायिक असलेल्या काही कुटुंबांना करण्यात आला. मग आमची बरीच पत्रा-पत्री, फोना-फोनी झाली आणि खालील माहिती संकलित झाली. वळंजू दांपत्याचे येथे विशेष आभार मानतो. त्यांनी जपून ठेवलेल्या मंडळाच्या जुन्या कागदपत्रांमुळे ही माहिती जमा करता आली. आता ही माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरुपात कायम जतन करून ठेवता यावी असा प्रयत्न करू या.
आजच्या मराठी मंडळाची बीजे रोवली गेली ती १९९० साली. 'मराठी वाङ्मय मंडळ' ह्या नावाने पहिली मराठी संस्था स्थापन झाली. १९ जानेवारी १९९० - अशी तारीख कागदोपत्री नोंदली गेली आहे. सौ. अलका वळंजू, श्री. दिलीप कर्णिक व सौ. सुहास गडकरी ह्यांनी पुढाकार घेऊन एकंदर ३०-३५ मंडळींनी डॉ. वळंजू ह्यांच्या घरी त्याचे कार्यस्वरूप आणि उद्दिष्ट्यं ठरवली. भारतातून अमेरिकेत येऊन स्थायिक झालेल्या मराठी लोकांना आपली भाषा, सण आणि कला संस्कृतीशी जवळीक साधता यावी अशा हेतूने ही मंडळी एकत्र आली. सुरुवातीला ह्या मंडळाचे स्वरूप नावाप्रमाणेच केवळ मराठी भाषा, साहित्य - कविता एवढ्यापुरतेच मर्यादित ठेवण्यात आले होते. कार्यक्रम दर दोन-तीन महिन्यांनी वाङ्मय सभा अशा स्वरुपात व्हायचे. तेव्हा संगणक युगाची सुरुवात झालेली नसल्यामुळे बातमीपत्र हाताने लिहिली जायची आणि कार्यस्थळाचे नकाशेदेखील हाताने काढले जायचे.
एप्रिल १९९१ पासून प्रथमच दर कुटुंबामागे $५ इतकी वर्गणी गोळा करायला सुरुवात झाल्याची नोंद आहे. २००१ सालच्या स्नेहदीपमध्ये लिहिलेल्या लेखातून प्रा. वळंजू गंमतीने म्हणतात की "नंतर (१९९२ नंतर) एक-दोन वर्षात म. वा. मं. च्या वाङ्मयीन हुकुमशाहीविरोधात जनतेने बंड पुकारले. हळूहळू भोजन, करमणुकीचे कार्यक्रम ह्यावर जास्त भर दिला जाऊन वाङ्मयाच्या वाट्याला थोडाच वेळ येऊ लागला." अशाप्रकारे १९९४ साली ऑस्टिन मराठी मंडळाची स्थापना झाल्याची नोंद ह्या लेखात आहे.
१९९४ ते १९९८ ह्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये मोजके कार्यकारी सदस्य असायचे. त्यामुळे अध्यक्ष वगळता तसा पदांचा फाफट पसारा नव्हता. कार्यकम पत्रिका ह्या पोस्टाने पाठविल्या जायच्या. त्यामुळे अनेकदा त्या लोकांना मिळाल्या आहेत की नाही हे विचारण्यासाठी आणि विशेष आमंत्रण करण्यासाठी फोन करावे लागत. प्रत्येक सदस्य ८-१० घरे वाटून घेऊन कार्यक्रमाची नोंदणी करीत असत. मंडळाचे बरेचसे कार्यक्रम फक्त पाच डॉलर भाडे असलेल्या UT Austin च्या एका सभागृहामध्ये व्हायचे. अरुण दाते, पद्मजा फेणाणी, कीर्तनकार आफळे, बाबासाहेब पुरंदरे असे काही नामवंत कलाकारांचे कार्यक्रम त्या दरम्यान आयोजले गेले. सगळा स्वयंपाक मंडळाचेच सदस्य घरीच करीत असत. मकर संक्रांत, गणेशोत्सव, दिवाळी आणि सहल असे ठरलेले कार्यक्रमही असत. मोजकी कुटुंबे असल्यामुळे मंडळाला एक प्रकारचे कौटुंबिक स्वरूप होते. प्रत्येकजण एकमेकांना ओळखत असे. मात्र सुरुवातीच्या या काही वर्षातील कार्यकारी समितीवरील सदस्यांची नोंद सापडलेली नाही.
१९९८ पासून ऑस्टिनमध्ये मराठी लोकसंख्या जोमाने वाढू लागली आणि नाटक, संगीत असे कार्यक्रम उत्साहाने साजरे होऊ लागले. २००१ साली स्नेहदीप ह्या आपल्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनास सुरुवात झाली. पहिल्या संपादिका होत्या अलका वळंजू. तसेच कोजागिरी सफर, आनंदमेळा ह्या कार्यक्रमांची कल्पनादेखील ह्याच सुमारास अंमलात आणली गेली. २२ जानेवारी २००२ रोजी मंडळाची ना-नफा ना-तोटा संस्था (Non-profit Organization) म्हणून अधिकृत नोंदणी करण्यात आली. २००३ साली मराठी मंडळाच्या कारभारात काही अमुलाग्र बदल घडून आल्याचे दिसते. सचिव आणि कोषाध्यक्ष ही पदे प्रथम कारभारात आली. सांकेतिक स्थळ (Website) ची नोंदणी आणि रचना करण्यात आली. तसेच मंडळाची इ-मेलद्वारे वार्तापत्र पाठवायलाही त्याच सुमारास सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत आपण ठराविक कार्यक्रमांची रूपरेषा थोड्याफार बदलांसह पाळत आलो आहोत.
२००४ पासून 'आविष्कार' ह्या संगीत आणि नाटकाच्या मोठ्या मनोरंजन कार्यक्रमाला सुरुवात झाली. दरवर्षी नेमाने संगीतसंध्या आणि एक नाटक असा हा कार्यक्रम सादर होतो. त्याचबरोबर मकर संक्रांत, गणेशोत्सव आणि दिवाळी असे आयोजित होणारे नियमित कार्यक्रम. त्याबरोबरच कधी आनंदमेळा, कधी वसंत सहल, तर कधी कोजागिरी नौका सफर, कधी खास पाहुणे कलाकारांची व्याख्याने, एकपात्री कार्यक्रम, शास्त्रीय संगीत कार्यक्रम, कधी मराठी चित्रपट तर कधी पाहुणे नाटक अशी विविधता आपल्या कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळालेली आहे. बाबासाहेब पुरंदरे, सुधीर गाडगीळ, राजेंद्र कांदळगावकर, शिरीष कणेकर, अजित केळकर, वंदना गुप्ते, राणी वर्मा, मंजिरी धामणकर इत्यादींनी आपल्या मंडळासाठी कार्यक्रम सादर केले आहेत.
२००४-०५ साली आपण मंडळाची स्वतःची ध्वनिक्षेपक यंत्रणा (PA System) विकत घेऊन स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले.
२४ मार्च २००६ रोजी ऑस्टिन मराठी मंडळाची 501-(c)(4) कर-मुक्त संस्था म्हणून नोंदणी झाली.
२०१० साली मंडळाच्या इतिहासातील पहिली अध्यक्षीय निवडणूक झाली. तसेच उपाध्यक्ष पदही बहुमत चाचणीद्वारे अनुमोदित करण्यात आले. तसेच मंडळाच्या सदस्यांना, मंडळाची सामुग्री (Assets), वैयक्तिक वापरासाठी भाड्याने देण्याच्या तरतुदीवर बहुमताने शिक्कामोर्तब झाले.
२०११ साली मंडळाचे बोधचिन्ह, घोषवाक्य एका स्पर्धेद्वारे निवडले गेले. तसेच २०११ साली अनेक नवीन योजना अंमलात आणल्या गेल्या. कार्यक्रम व भोजन प्रायोजक (Sponsorships), व्यावसायिक सभासदत्व (Business membership), राज्यातल्या मंडळांशी कार्यक्रम देवाण घेवाण (Program exchange with Texas Mandals), मंडळाच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या कलाकारांना प्रवेश शुल्क सवलत (Discount tickets) इत्यादि. तसेच ह्यावर्षी मंडळाने 'फेसबुक'वर आपले खाते उघडले. मकर संक्रांतीला खास मुलांसाठी “सांगा सांगा शब्द सांगा” हा नवीन game show सादर झाला. दिवाळीच्या कार्यक्रमाला ठोस आणि व्यावसायिक स्वरूप देण्याच्या दृष्टीने “दीपोत्सव” ह्या बहु-पदरी महोत्सवाची पायारोवणी केली. त्यात ‘ताक धिना धिन” ह्या वार्षिक नृत्यस्पर्धेचा समावेश झाला. अमराठी रसिकांची उपस्थिती आणि सहभाग हे ह्या कार्यक्रमाचे वैशिष्टय ठरले.
२०१२ साली स्थानिक कलावंतांना, मोठ्या स्तरावर आणि यथायोग्य साधन सामुग्री वापरून, उच्च दर्जाचे कार्यक्रम सादर करता यावेत, ह्या दृष्टीकोनातून $८०० चे वार्षिक अनुदान जाहीर करण्यात आले.
कार्यक्रम आणि वार्षिक वर्गणीसाठी नवीन योजना राबविण्यात आल्या. Payment system सुलभ करण्याच्या हेतूने one channel सुलेखा Online Payments ची सुरुवात झाली.
कार्यक्रम व भोजन प्रायोजक योजनेचा विस्तार करण्यात आला.
दिवाळी उत्सव १२०० capacity चे auditorium घेऊन अति मोठया स्तरावर आयोजित करून येऊ घातलेल्या रौप्य महोत्सवाच्या दृष्टीने पाऊले उचलली. ह्या कार्यक्रमाने सर्वोच्च उपस्थितीचा नवीन उच्चांक स्थापन केला.
२०१३ साली समितीने अनेक अमुलाग्र बदल घडवून आणले ते पुढीलप्रमाणे -
२०१४ साली समितीने खालील योजना अमलात आणल्या अथवा वृद्धिंगत केल्या-
२०१५ साली आपल्या मंडळाने पंचविसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. ह्या रौप्य महोत्सवी वर्षात अनेक नवीन योजना, सामाजिक उपक्रम आणि भरघोस मनोरंजन घेऊन आपल्यापुढे येण्यासाठी विशेष समिती तयार होत आहे!
आता एक नजर आपल्या सर्व कार्यकारिणी सामित्यांसाकडे -

- कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमेरिका आणि भारताची राष्ट्रगीते.
- सामाजिक कार्यासाठी अनेक योजना राबवून $१८००० च्या वर देणगी निधी जमावाला.
- आरोग्य आणि शारीरिक क्षमता ह्यावर भर देऊन अनेक धावपटू तयार केले
- स्थानिक यशस्वी सदस्यांचे कौतुक म्हणून - मराठी पाउल पडते पुढे - ह्या गौरव उपक्रमाची स्थापना करण्यात आली.
- ऑस्टिन मराठी शाळेची स्थापना
- 501-C-3 कर-मुक्त संस्था नोंदणी आवेदन पूर्ण केले.
- P O Box
- एकूण कार्यक्रमांची विक्रमी संख्या आणि सदस्य संख्येत वाढ.
२०१४ साली समितीने खालील योजना अमलात आणल्या अथवा वृद्धिंगत केल्या-
- स्थानिक आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तराच्या संस्थांशी अधिक सांस्कृतिक आणि सामाजिक देवाणघेवाण
- 501-C-3 कर-मुक्त संस्था मान्यता आणि पुढील अंमलबजावणी
- बृहन महाराष्ट्र मंडळाच्या २०१५ सा रे ग म गायन स्पर्धेच्या क्षेत्रीय फेरीचे यशस्वी आयोजन
- Marathis On Mission (MOM) उपक्रमाचा श्री गणेशा आणि त्या अंतर्गत मैना foundation , एकल विदयालय आणि महाराष्ट्र foundation ह्या संस्थांना देणग्या.