Shala News: Hearty Congratulations to Sau. Aarti Paralkar for getting BMM's Teacher of the year 2019 award.
सौ. आरती अनमोल परळकर ह्यांना बृहन्महाराष्ट्र मंडळाचा Teacher Award 2019 मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
सौ. आरती अनमोल परळकर ह्या ऑस्टिन मराठी शाळेच्या स्थापनेपासूनच परदेशात लहान मुलांना मराठीची गोडी लावण्याच्या कार्याला समर्पित आहेत. NRI मुलांना मराठी शिकतांना अवघड संकल्पना सोप्या व्हाव्या म्हणून त्यांनी हस्तकलेला यशस्वी साधन केले आहे. मुलांना लेखी अभ्यासक्रमासकट मराठी बोलता-वाचता कसे येईल ह्याकडे त्या जातीने लक्ष देतात. आपल्या मुलांशी लेखी संवाद साधतांना (text, email) त्या कटाक्षाने मराठीचा वापर करतात. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहन व शिस्तीची सुयोग्य पाठ थोपटणी देत अन्य शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांच्या मनात त्यांनी आदर व प्रेमाचं हक्काचं स्थान काबीज केलं आहे. त्यांना मिळालेल्या ह्या पुरस्कारावर प्रतिक्रिया विचारल्यावर त्या म्हणाल्या की हा बहुमान म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळाने माझ्या कार्याबद्दल दाखवलेला विश्वासच आहे व आता त्यांची व ऑस्टिन मराठी शाळेची जबाबदारी वाढली आहे असे त्यांना वाटते. इतर शिक्षकांच्या वेगवेगळ्या कार्यप्रणालीबद्द्ल जाणून घ्यायला त्यांना नक्कीच आवडेल. किंबहूना त्यामुळे मराठी जिवंत ठेवण्याचे कर्तव्य आपण असेच पुढे चालत ठेवु शकू असा त्यांना विश्वास वाटतो.